पुणे, : शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, श्री विवेक राजाराम क्षीरसागर (वय 69) यांनी त्यांच्या दूरच्या भाचीच्या वडिलोपार्जित हक्कांबाबत झालेल्या फसवणुकीबाबत गंभीर आरोप केले आहेत. क्षीरसागर यांनी बोलू, चालू न शकणारी दिव्यांग भाची, कु अश्विनी सुशिल खळदकर, हिच्या हक्कांच्या मालमत्तेवर बनावट दस्तऐवजांचा वापर करून फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.
क्षीरसागर यांच्या तक्रारीनुसार, 2008 साली अश्विनीचे वडील कै सुशिल खळदकर यांच्या निधनानंतर आणि 2010 साली तिच्या आईच्या निधनानंतर ती तिच्या वडिलोपार्जित घरात एकटी राहत होती. अश्विनी च्या वडीलांच्या मालमत्तेबाबत बनावट दस्तऐवज तयार करून मनोज बहिरट व सोनल बहिरट यांनी मालमत्तेवर हक्क सांगीतला होता.
तक्रारीत असेही म्हटले आहे की, अश्विनीचे घर बळकाविण्याच्या उद्देशाने मनोज बहिरटने तिच्या घरावरील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टाकले, तिच्या घराचे नळ कनेक्शन बंद केले.या प्रकरणात अश्विनीला धमक्या देऊन तिच्यावर दबाव आणण्याचाही आरोप करण्यात आला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.