कात्रज चौक की ‘जाम’ स्थिति: यातायात व्यवस्था चरमराईपुणे

। कात्रज चौक पर फ्लाईओवर के निर्माण कार्य के कारण मंगलवार से यातायात में बदलाव किए…

पीएमआरडीए क्षेत्र में एक दशक में 10,000 अवैध निर्माण, प्रशासन की भूमिका पर सवाल

पुणे। पुणे और पिंपरी-चिंचवड़ नगर निगम क्षेत्रों को छोड़कर शेष पुणे जिले के समग्र विकास के…

पिंपरी: 200 करोड़ से अधिक के बकायेदारों पर महापालिका का शिकंजा, 2683 संपत्तियों की होगी जब्ती

पिंपरी । पिंपरी-चिंचवड़ महापालिका ने 3 लाख रुपये से अधिक बकाया रखने वाले व्यावसायिक, औद्योगिक और…

देवेंद्र फडणवीस की ताजपोशी की खबर पर पुणे में भाजपा कार्यकर्ताओं ने मनाया जश्न

पुणे। महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता देवेंद्र फडणवीस के तीसरी बार मुख्यमंत्री बनने…

वन्नेस मूवमेंट के संस्थापक मुक्ति गुरु कृष्णाजी का “एक्सपीरियंस एनलाइटनमेंट” कार्यक्रम पुणे में आयोजित

पुणे: संपत्ति और समृद्धि के लिए आवश्यक महत्वपूर्ण बातों की जागरूकता बढ़ाने का कार्य वन्नेस मूवमेंट…

पुणेकरांना भावली ‌‘तेव्हाची गोष्ट‌’कविता, गझल आणि रुबायांचे भावत्कोट अभिवाचन

पुणे : उबदार नात्यांच्या शोधात असणाऱ्या, दु:खाकडे पाहण्याची वेगळी नजर लाभलेल्या, जगण्यातले दुर्दैवी वास्तव आणि विचित्र…

एमआईटी डब्ल्यूपीयू में ‘स्पोर्टस एडवाइजरी बोर्ड’ का गठनविश्वविद्यालय में खेल संस्कृति को बढ़ावा और खेल क्षेत्र को पुनर्जीवित करना

विज्ञप्ति जारी करने                          …

एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘स्पोर्टस अ‍ॅडव्हॉयझरी बोर्डची’ स्थापनाविद्यापीठात क्रीडा संस्कृती वाढविणे व क्रीडा क्षेत्राला नव संजीवनी देणे

कृपया प्रसिध्दीसाठी दि.३ डिसेंबर २०२४ पुणे, दि.३ डिसेंबर: क्रीडा क्षेत्रातील मातब्बर देश म्हणून उदयास आणायचे असेल,…

जयंत(दादा )कुलकर्णी यांना श्रद्धांजलीसाठी दि.३० रोजी सभा

विवेकानंद केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे संचालक  जयंत(दादा) कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवार, ३० नोव्हेंबर २०२४, सायंकाळी  ५ वाजता,…

महाराष्ट्राची हास्यजत्रा

सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या कार्यक्रमची नवी पर्वे, त्यांतले नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वामध्ये आपल्याला नक्कीच नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे. तब्बल ६ वर्षांहून जास्त काळ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या कार्यक्रमाचे आजवर ८००पेक्षा अधिक भाग प्रसारित झाले आहेत. ह्या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केले असून प्रेक्षकांनीही त्यांच्या या आवडत्या कार्यक्रमाला भरपूर प्रेम दिले आहे. २ डिसेंबरपासून  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, कॉमेडीची हॅटट्रीक हे नवे पर्व सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. या पर्वाचे वैशिष्ट्य काय असणार आहे, याबद्दल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ या कार्यक्रमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले, “प्रेक्षकांनी यापूर्वी प्रहसनांच्या अनेक मालिका पाहिल्या. यांतून अनेक पात्रे लोकप्रिय झाली, पण ती पात्रे फक्त त्या–त्या मालिकेमध्ये पाहिली. या नव्या पर्वामध्ये वेगवेगळ्या मालिकांमधली पात्रे एकमेकांच्या मालिकांमध्ये जाऊन धमाल करताना प्रेक्षकांना पाहायला मिळतील. ह्या पर्वात हा नवा प्रयोग आपल्याला पाहता येईल. यातून नक्कीच मोठा हास्यकल्लोळ निर्माण होईल आणि तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे.” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ या कार्यक्रमाचे निर्माते आणि लेखक सचिन मोटे म्हणाले, “यंदाच्या पर्वात प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये काही नवनवीन पात्रे पाहायला मिळतील.” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे लेखक पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत आणि आधीच्या विषयांमध्ये नवीन पात्रांचा आणि गोष्टींचा समावेश करून ते सादर करण्यात येणार आहेत.’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचे विशेष प्रोमोज प्रेक्षकांना आवडताहेत. पहिल्याच काही भागांमधला आश्चर्यचकित करणारा  पहिलाच भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पैलवान प्राजक्ता चव्हाण आपल्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रहसन सादर करताना दिसणार आहे. ‘तुजं माजं सपान’ या मालिकेतून दिसलेला तिच्यातला मुळातला रांगडेपणा प्रेक्षकांना भावला होता.  तोच अभिनय आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हास्यवीरांसह रंगलेले तिचे धमाल असे प्रहसन प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. तिचा कोल्हापुरी ठसका आणि कोल्हापुरी ठसकेबाज भाषा आता हास्यजत्राच्या मंचावर पाहायला मिळेल. तर पाहायला विसरू नका, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, कॉमेडीची हॅटट्रीक, २ डिसेंबरपासून सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.