पुणे : काँग्रेस अध्यक्षांना राज्यसभेत बोलू न दिल्याचा काँग्रेस जनमानसात निषेध नोंदवणार भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांस, राज्यसभेत मोदी एकतर्फी असत्य, तथ्यहीन व खोटे आरोप करत असतांना त्यावर ऊचीत खुलासा मांडणे बाबत, संविघानिक अघिकारांतर्गत बोलू न दिल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तीव्र निषेध करत असल्याचे राज्य प्रवक्ते गोराळदादा तिवारी यांनी पत्रकार परीषदेत सांगितले तसेच जनतेत जाऊन देखील भाजपच्या मनमानी व दडपशाही कारभाराचा निषेध नोंदवणार असल्याचे सांगितले..!
राजीव गांधी स्मारक समितीच्यावतीने पत्रकार भवन येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस जेष्ठ काँग्रेसजन सर्वश्री सुभाषशेठ थोरवे, रामचंद्र शेडगे, महेश अंबिके, धनंजय भिलारे, संजय अभंग, गणेश मोरे, ऊदय लेले, गणेश शिंदे, राजेश सुतार इ उपस्थित होते.
गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले, “मोदी काळाच्या अनुभवा नंतरच, २०१९ च्या तुलनेत जनतेने भाजपच्या २२% टक्के जागा घटवल्या तर काँग्रेसच्या ९८% जागा वाढवल्या तसेच एनडीए आधाडी पेक्षा ही इंडीया आघाडीस ३.५६ % मतांचे प्रमाण जास्त आहे या वास्तवतेचे भान देखील मोदींनी ठेवले पाहीजे..!
राहुल गांधी यांचा लोकसभेत सामना करण्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री व ७ ते ८ मंत्री विना सभापती मान्यते विना खुलासा करण्यासाठी ऊभे रहातात मात्र राज्य सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्रीकार्जून खर्गे यांना मात्र मोदींच्या खोट्या आरोपांवर हात वर करून सुध्दा संधी दिली जात नाही हे निंदनीय आहे..!
वास्तवतेला नाकारत, काँग्रेस पक्ष पराभवाचा उच्चांक गाठत असल्याचे खोटे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, अशी विधाने करून ते जनतेला भ्रमित करीत असल्याचे प्रतिपादन गोपाळ दादा तिवारी यांनी केले.
शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याचा राजीव गांधी स्मारक समिती प्रयत्न करणार, लवकरच पुण्यात वाहतूक परिषदेचे आयोजन
शहरातील अरुंद रस्त्यांची रुंदी मात्र वर्षा नु वर्षे तितकीच असताना, “संभाव्य रस्तारुंदी” गृहीत धरून वाढीव चटई क्षेत्रे मंजुर करून, बांधकामे मात्र प्रचंड वेगाने होत आहेत.
प्रस्तावित रस्ते रुंदी पेक्षा वास्तवतेतील रस्ते रुंदींवर चटई क्षेत्र मंजुर करण्याची खरे तर काळाची गरज आहे..!
सोसायट्यांचा पुनर्विकास होताना वाढीव एफएसआय घेऊन मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत.
त्यातील २०% वाहने जरी रस्त्यावर आली तरी वाहतुक कोंडी होते.. त्यामुळे पुणे शहर सध्या वाहतूक कोंडीच्या तीव्र समस्येला सामोरे जात आहे, येणाऱ्या काळात हा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुरेशा रुंद – रस्त्यांच्या नियोजना अभावी मेट्रोचा ४ % वाढीव एपएसआय देणे कितपत योग्य असल्याचा प्रश्न पुढे येता त्यामुळे यावर तज्ञांची साधक बाधक चर्चा घडवून आणण्या साठी “वहातुक परिषदेचे” आयोजन, ‘राजीव गांधी स्मारक समिती’च्यावतीने येत्या ८ दिवसात पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर केले जाणार असल्याची माहिती गोपाळ दादा तिवारी यांनी दिली. या परिषदेत माजी सनदी अधिकारी, नियोजनकार, वास्तु विषारद, लोक प्रतिनिधी इ उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.