संस्थेचे अध्यक्ष श्री.कृष्ण कुमार गोयल यांनी त्यांच्या भाषणामध्ये सेवानिवृत्त झालेले श्री.रामभाऊ बारगजे यांचे बद्दल मितभाषी आणि नम्र स्वभावाचे असल्याने त्यांचे कधीही कोणाबरोबर वाद झाल्याचे आठवत नसल्याचे मत व्यक्त केले वेळ आणि शिस्त त्यांनी संपूर्ण सेवेमध्ये काटेकोरपणे पाळली असेही ते म्हणाले. सौ.ललिता काकडे यांचा विद्यार्थी विकासामध्ये मोलाचा वाटा असून 31 वर्षाची त्यांची ही कारकीर्द स्मरणात राहणारी असेल विद्यार्थ्यांमध्ये शिस्त तथा अध्यात्माची गोडी त्यांनी निर्माण केल्याचेही ते म्हणाले. दोन्ही सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे आदर्श गुण संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांनी आत्मसात करावे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे जेष्ठ लिपिक रामभाऊ रावसाहेब बारगजे आणि जीएमआय कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ललिता विष्णू काकडे या ३० जून 2024 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ आज रोजी संस्थेच्या दत्ताजी गायकवाड सभागृहामध्ये उत्साहात पार पडला संस्थेचे ऋण व्यक्त करताना श्री. रामभाऊ बारगजे म्हणाले जन्म भूमीप्रमाणे संस्थेची ही कर्मभूमी मला विसरता येणे शक्य नाही माजी सहकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देत संस्थेचा मी कायम ऋणी राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सध्याचे प्राचार्य सहसचिव डॉ. संजय चाकणे यांच्या विविध उपक्रम आणि त्यांनी घेतलेल्या कार्यशाळा याबद्दल महाविद्यालयाचे भवितव्य उज्वल असणार याबाबत समाधान व्यक्त केले. सौ. ललिता काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जी. एम. आय कन्या शाळेतील प्रत्येक मुलगी ही माझी मुलगी असून शाळा हे माझे माहेर असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शाळेबद्दलच्या आठवणी सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. याप्रसंगी खडकी शिक्षण संस्थे करिता रुपये दीड लाख देणगी त्यांनी उत्स्फूर्तपणे दिली. प्रमुख पाहुणे म्हणून अध्यात्म गुरू रोहिणी कुमार प्रभुजी आणि गोपती प्रभुजी यांची भाषणे झाली या प्रसंगी श्री. बारगजे आणि सौ. काकडे यांच्या गौरव ग्रंथा चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष श्री. अनिल मेहता. सचिव श्री. आनंद छाजेड,संचालक श्री. मधुकर टिळेकर, श्री. राजेंद्र भुतडा, श्री. रमेश अवस्थी तथा संस्थेच्या सर्व विभागातील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक *प्राचार्य सहसचिव डॉ.संजय चाकणे यांनी तर सूत्रसंचालन जी. एम. आय कन्या शाळेच्या सौ .वैशाली वाघ यांनी केले आभार प्रदर्शन सौ सुनंदा चपटे यांनी व्यक्त केले