रोटरी क्लब फिनिक्सच्या “रंगीत सावली” ने जिंकली रोटरी क्लब शिवाजीनगर एकांकिका स्पर्धा

Spread the love

पुणे : रोटरी क्लब शिवाजीनगर आयोजित स्वाती क्षीरसागर करंडक ही एकांकिका स्पर्धा रोटरी क्लब फिनिक्सच्या “रंगीत सावली” एकांकिकेने जिंकली. या स्पर्धेत १४ संघांनी भाग घेतला होता. बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी होते. भरतनाट्य मंदिर यथे संपन्न झालेल्या या बक्षीस वितरण प्रसंगी रोटरीचे नियोजित प्रांतपाल संतोष मराठे रोटरी क्लब शिवाजीनगर अध्यक्ष डॉ.भारती डोळे,डॉ.निलेश कुंभोजकर,डॉ.सुनीला रानडे,श्री गोंधळेकर,मयुरेश कुलकर्णी,अच्युत गोखले,मंगलाताई गोडबोले,शिरीष क्षीरसागर आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी,सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *